मी चोरून साखर खातो तेव्हा

साखर मले मस्तच आवडते.

मी घरी कोणी नसले, तर गुपचूप साखर खातो.

आई वावरात गेली रायते, बाबा कामावर गेले रायते, ताई बाहेर कपडे गिन त धुत रायते, अशा वेळी मी हळूच सैपाकघरात घुसतो अन् बकनाभर साखर खातो.

साखरेचा डब्बा आई कोठीवर ठेवते, माझा हात पुरते. मले जेव्हा जेव्हा साखर खाऊशा वाटते तेव्हा तेव्हा मी डबा उघडून साखर खातोच.

आईले माहीत पडलं असंल, पन आई काही मनली नाही.

एक डाव मी घरात एकटाच होतो, तवा मले साखर खाऊशा वाटली.

मी घरात गेलो, वाटीभर साखर घेतली अन् कोपऱ्यात बसून साखर खाल्ली.

मग मले झोप आली. मी झोपलो. उठल्यावर पुन्हा साखर खाऊशा वाटली, तर मी पुन्हा अर्धी वाटी साखर खाल्लो.

मग मी बाहेर खेळाला गेलो. अंकुशा सोबत खेळलो, मले पुन्हा साखर खाऊशा वाटली, मग मी आणि अंकुशानं दोघं मिळून 2-2 चमचे साखर खाल्लो.

संध्याकाळी आई घरी आली. चाय मांडत होती. सकाळी तर डब्बा फुल भरून होता, आता अर्धा कसा म्हणून मनली, तवा मी मनलो, मांजरी न गिन त खाल्ली असंल.

आई काही मनली नाही.

फकस्त हासली माज्याकडं पाहून.

 

कृष्णा रविंद्र देवाळकर  | इयत्ता चौथी

जि.प.प्रा.शाळा, आवाळपूर