लगीन मनीमाऊचं
मनीमाऊ आणि बोक्याचे आज लग्न होते. सगळ्या दुनियेला आमंत्रण होते.
हत्तीवरून मिरवणूक निघाली.
जिराफ आनंदाने नाचत होता.
माकडाची स्वारी ढोल वाजवत होती… डिमडिमडुम डिमडिमडुम… पंगतीला जेवण वाढले होते.
डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम
आता नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे… तर नवरामुलगाच गायब! गेला कुठे हा?
गुपचूप स्वैपाकघरात शिरला…
सगळ्यांसाठी आणलेले दूध, एका दमात पिऊन टाकले त्याने!!!
नवऱ्या मुलीच्या आईने हे पाहिले मात्र… ती इतकी रागावली!!!
‘‘अरे देवा! काय हे वागणे… या मुलाने तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. काही नको आता लग्न नि बिग्न!’’
डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम डिमडिमडुम
*तामिळनाडूमधील तुलीर (Thulir) शाळेतील मुलांनी पाठ्यपुस्तकातील कवितेचे चित्रकथेत रूपांतर केले आहे.