Intro
Add Bio

औरंगाबादचे आमचे एक मित्र मिलिंद कंक यांना खेळघराचे, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने ‘ हे पुस्तक फार आवडले. त्यांनी त्याच्या शंभरेक प्रति विकत घेतल्या विकत घेतल्या.हे पुस्तक सरकारी शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोचावे अशी त्यांची इच्छा होती.औरंगाबादच्या नयी तालीम समिती च्या विश्वस्त कार्यकर्त्या शोभाताईं शिराढोणकर यांनी ही पुस्तके काही उत्साही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांपर्यंत पोचवण्यात पुढाकार घेतला. ३८ शिक्षकांना ही पुस्तके मिळाली.कंक सरांनी इतरही अनेकांना हे पुस्तक भेट दिले. श्रेयस बालक मंदिर संस्थेच्या विश्वस्त मीनल नाईक यांना ही दिले होते. मीनल ताईंना ते फार आवडले. त्यांनी मुद्दाम पुण्याला येऊन खेळघराचे काम समजावून घेतले. आज त्यांच्या आमंत्रणावरून मी श्रेयस बालक मंदिर या संस्थेतील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आले होते. प्रशिक्षण चांगले झाले, शिक्षकांना ही दुनिया नवीन होती… त्यांनी शिकण्याची उत्सुकता दाखवली. पुढील काळातील आणखी खोलात जाऊन प्रशिक्षणाची आखणी झाली. या प्रशिक्षणानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना ही पुस्तके दिली होती त्यातले १०-१२ शिक्षक शोभाताईंच्या वाचनालयात आले होते… २ तास फार छान चर्चा झाली. त्यांनी पुस्तक वाचले होते. त्यातल्या activity घेतलेल्या होत्या. स्वतः त्यात भर देखील घातली होती. एकदम active , sensetive aani possitive शिक्षक आहेत हे! १०-२० km प्रवास करून ते मला भेटायला आले होते. कुठल्याही शासकीय बडग्यशिवाय! मला फार कौतुक वाटले त्यांचे. आणि त्यांना जी पुस्तके दिली त्याचे सार्थक देखील वाटले.

Shubhada Joshi