बालपणातून सुटका

मुलं असण्याचं ओझं

बालपण हे सगळ्या आयुष्यापासून वेगळं काढणं, ती बालपणाची फुलबाग सुरक्षेच्या कृत्रिम भिंती घालून वेगळी करणं, मुलांनी त्यातच राहावं अशी अपेक्षा हे काहीच साधत नाही. त्याचं एक कारण असं आहे – जे लोक असं संरक्षण देऊ इच्छितात, भिंती बांधून अलग करायला बघतात ते स्वतः त्यांच्या आत राहू शकत नाहीत. मग ज्यांच्यासाठी हे आपल्याला करावं लागतंय त्या मुलांचाच राग यायला लागतो.
‘ह्यांना मात्र सगळं सोपं, मला मात्र वैताग’ असं कडवटपणे वाटायला लागतं. हे सगळं प्रत्यक्ष व्यक्त केलं जातं. मग ज्या जगापासून संरक्षण करावं अशी इच्छा होती त्या जगात घडावेत असेच कटू प्रसंग बालपणाच्या फुलबागेत घडू लागतात.

आजपर्यंत अनेकदा असं दिसलं आहे की मोठी माणसं त्यांच्या आवडत्या माणसांशी जसं वागतात तसं मुलांशी वागत नाहीत. उलटच वागतात. चिडचिडलेल्या अस्वस्थ मनाने सतत चुका शोधतात आणि त्यांना त्या सापडतात ! मुलांना सुट्टीवर, प्रवासात बागेत फिरायला नेणार्या , नाटकासिनेमांना नेणार्या लोकांचंही असंच दिसतं. नेहमी ताणात ! शांत म्हणजे खरं शांत नव्हे, राग आवरून धरलेला असणं. मुलं एकटी दिसली की ‘काय चाललंय रे? तुमच्या बरोबर कुणी मोठं नाही काय करा ते सांगायला?’

याला बरीच कारणं दिसतात. पूर्वी एकदा मूल ३-४ वर्षाचं झालं की त्याला ‘वाढवावं’ लागत नसे. ते लगेच कामं करायला लागे. मनुष्यबळात भर घाले. जिथे त्यांच्या कष्टाची गरज नसे तिथं त्यांच्यावर लक्ष ठेवत बसायला लागत नसे. मुलांना खेळायला, फिरायला, मोकळ्या सुरक्षित जागा होत्या. मुलांना शांतपणे खेळायला सोडता येत होतं. त्यांना वाढवताना येणारे ताण, खर्चाचा बोजा, जाहिरातीतून दिले जाणारे संदेश नव्हते ः विकत घ्या घ्या घ्या ! मुलं चांगली व्हायला हवी असतील तर त्यांना हे घेऊन द्या… ते घेऊन द्या…

शिवाय शाळा, शिक्षण… न संपणारी यादी होईल. पालकांवर असं कर्तव्याचं ओझं आहे की त्यांनी मुलांवर प्रेम केलंच पाहिजे आणि मुलांनीही पालकांवर प्रेम केलंच पाहिजे. मग हे नातं बंदिस्त, त्रासदायक, ताणलेलं होतं. तरीही ते तुम्हाला आवडायलाच पाहिजे ! असंही ओझं त्याचं होऊन बसतं.

पालकांना सरळपणे या ओझ्यातून बाहेर येण्याचा मार्गच नाही. ‘आमची लहान मुलं, जी मरणाची काळजी करायला लावतात, बराचसा खर्च होतो, त्यांना जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं’ असं लाज न वाटता कबूल करणं शक्यच नसतं. याउलट मुलांनी न मागता जो जन्म त्यांना मिळालाय त्याबद्दल मुलांना जाणीव/कृतज्ञता असायला हवी, हा आग्रहही असतो.
मुलं मोठी झाल्यावर या काळज्या, खर्च वाढतच जातात. सर्वात जास्त ओझं कसलं होत असेल तर ते या नव्या दृष्टिकोनाचं की ‘प्रत्येक मूल हे सर्वोत्तम होऊ शकतं किंवा अपयशी ! आणि पालकांच्या हातात याची किल्ली आहे – सर्वोत्तम का अपयशी’ तुमचं मूल काय करतंय यावरून तुम्ही कसे आहात हे ठरणार. हे तर भयंकरच आहे.
एखादं मूल सार्वजनिक ठिकाणी आईबरोबर काहीतरी कामानिमित्त आलं आहे आणि जवळ खेळतंय. आईचं काम चालू आहे, जर दुसरं कोणी जवळपास आलं तर त्या मुलाबरोबर मी आहे हे दाखवण्याची गरज पडते. आई लगेच त्याचं बखोट पकडून सांगणार, ‘ए, पळू नको हं इकडं तिकडं’ कदाचित एक फटकाही बसेल त्याला.
हे सगळीकडेच होताना दिसेल. मुलं कुठंही मजेत फिरताना दिसली तरी मोठ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात.

मुलांसाठी adventure parks तयार करणार्याम एका कंपनीचं म्हणणं आहे की त्याभोवती कुणाला आतलं दिसणार नाही असं कुंपण घाला. मुलांना मोकळं, स्वतंत्र वाटावं एवढंच त्याचं कारण नाही तर मुलांना मजा करताना पाहून बर्याोच मोठ्यांना हे पार्क नकोसे वाटतात म्हणून.
ही भीती, तिरस्कार, नावड, द्वेष सर्वात जास्त दिसतो शाळांमध्ये. शाळा म्हणजे किती कंटाळवाण्या उदास झाल्या आहेत. शिकण्यातला आनंद, उल्हास, उत्स्फूर्तता सगळं हरवत चाललं आहे. शाळेत किती फुटकळ गोष्टी शिकवल्या जातात आणि किती दबाव त्यासाठी येतो याकडे कुणाचं लक्ष नाही. नवीन शाळांमधे, पुस्तकं, उपकरणं, इमारत नवीन असते. पण विचार-पद्धती जुन्याच असतात. काही थोडेसे अपवाद आहेत. पण एकंदरीत शाळा जास्त शिस्तबद्ध, जास्त भीतीदायक, जास्त बंधनकारक असाव्यात असंच बहुमत आहे.
त्यामुळे ही बालांसाठीची फुलबाग बाहेरच्या जगापेक्षा जास्त वाईट, जास्त स्पर्धात्मक, क्रूर झाली आहे. ‘त्यांना आज ना उद्या जग कसं आहे, हे कळायलाच हवं ना?’ असंही काही जण म्हणतात. तेव्हा मग मला वाटतं, आपला उद्देश त्यांना संरक्षण देण्याचा नसेल, त्यांना बाह्य जग कसं आहे ते शिकवण्याचाच असेल तर त्यांना सरळ तिकडेच जाऊन शिकू देत.
बालपणाचा उपयोग
बालपणी बालकं म्हणजे जरी ओझं – त्रास देणारी असली तरी त्यांचा फार महत्त्वाचा उपयोग असतो. कुटुंबात फार काही काम ती करू शकत नाहीत. पैसा मिळवू शकत नाहीत पण एक अत्यावश्यक गोष्ट ते मोठ्यांना मिळवून देतात. बर्याैच मोठ्यांना अत्यंत गरजेची असलेली गोष्ट : कुणीतरी अधिकार गाजवण्यासाठी, मदत करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी.
कितीतरी काळ, जेव्हापासून समाजातले काही लोक इतरांवर अधिकार गाजवतात अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हापासून मुलांनी ही कामगिरी बजावलेली आहे. कोणताही प्रौढ पालक, कितीका गरीब असेना त्याला हुकूम सोडायला, घाबरवायला, शिक्षा द्यायला कुणीतरी मिळालंच ! पूर्वीचे गुलाम होते त्यांनासुद्धा स्वतःचे हे गुलाम मिळाले. आज जेव्हा बर्यांच मोठ्या माणसांना आपण गुलाम आहोत असं वाटतंय त्यांना घरी हे स्वतःचे गुलाम असणं फारच समाधानाचं. त्यांच्याशिवाय अनेकांचं चालणारच नाही.
अनेकदा पाहिलेला एक प्रसंग परवा पुन्हा एकदा पाहिला. एक छोटा मुलगा आणि त्याचे बाबा गाडीत चढले. खूप जागा होती. पण बाबांना उभं राहायचं होतं. मुलानं मात्र बसावं अशी इच्छा होती. मुलाकडे न बघताच, निर्विकार आवाजात ‘‘बस’’ आणि हातानी बसण्यासाठी खूण ! एखाद्या कुत्र्याला सांगावं तसं. कुत्र्याशी लहान मुलासारखं बोलतानाही खूप जण दिसतात पण काही अपवाद असतात. मुलगा ताबडतोब बसला. न ऐकल्यास येणारा राग, मिळणारी शिक्षा बाबांच्या आवाजामागे सगळ्यांनाच दिसली होती.
बर्याीचशा मुलांना कधी न कधी लक्षात येतं की आईबाप आपल्याशी जसे बोलतात तसेच इतर कुणाशीही बोलत नाहीत. अर्थात याला आपल्याकडे उत्तर असतंच. मुलांच्यावर अधिकार दाखवताना हे उत्तर नेहमीचं असतं, की मुलांच्याबद्दल पोटात माया आहे. त्यांचं भलं व्हावं म्हणूनच आम्ही हे करतो. जसं मुलांना फटका मारताना म्हणतात, ‘‘यामुळे तुझ्यापेक्षा जास्त दुःख मला होतं आहे !’’ बहुतेक जगातलं सर्वात प्राचीन खोटं बोलणं !
आईबापाचं मुलांशी बोलणं यावर एक प्रहसन पाहिलं. मुलांच्या जागी ‘पाहुणे’ होते. ‘‘उठ माझ्या खुर्चीवरून. दिवसभर कष्ट करून घरी यावं तर माझ्या आवडत्या खुर्चीवरही बसू देत नाहीस.’’ ‘‘हात धू आधी ते घाणेरडे. कितीदा सांगायला लावता.’’
आता ज्या घरी आपण बाहेरच्यापेक्षा मोकळेपणाने, चांगलेपणाने वागू शकतो अशी आपली खात्री असते त्याच घराला मुलांसाठी मात्र आपण करकरीत, क्रूर, अपमानकारक, बाहेरच्यापेक्षा वाईट वागण्याची जागा समजतो. ज्यांच्या आधार, संरक्षणावर मुलं अवलंबून असतात, ते त्यांना सर्वात जास्त त्रास देणारे ठरतात.
मदत आणि मददगार?
ज्यांना मदत करण्याची गरज आहे त्यांना मदत करणं यात वाईट काय आहे? असं आपल्याला वाटतंच. परोपकार आणि त्यावरच्या गोष्टी अनेक आहेत. (बायबल -Good samaritan and injured traveller) पण दुसर्याव कोणाला तरी मदत करणं म्हणजेच जीवन असं ज्यांच्या बाबतीत दिसतं ते मला फार त्रासदायक वाटतं. ही मदतही न मागताच दिलेली असते. या मदतीशिवाय जगायला ‘दुसरे काही लोक’ नालायक आहेत अशी भावना यामागे बरेचदा असते. ही कदाचित स्पष्टपणे बोलून दाखवली जात नाही, कधी जातेही पण परिणाम एकच असतो. ‘तुम्ही माझ्या (मदती) वर अवलंबून आहात’ हे जाणवून दिलं जातं. ज्याचं आयुष्यच दुसर्यां ना मदत करणं एवढंच आहे, त्याला मदत लागणारे गरजवंत सततच हवे असणार ! या मदत करणार्या व्यवसायांमधलं दुःख म्हणजे यातले काही लोक देव बनायला लागतात ‘शिक्षक, मानसरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक काम करणारे,’ इ. काही देव प्रेमळ आणि benevolent असतात. पण काही अगदी नकळत क्रूर, करकरीतपणे वागणारे ! देव बनायचं म्हणजे बाकीची बाहुली असायला लागतात सभोवती, आणि देवाचं सैतानात रूपांतर व्हायला थोडीशी निराशा पुरेशी असते.
आपण सतत ऐकत असतो. ‘‘हां. थांब, तू नको करूस. मी देतो करून तुला. मला तुझ्यापेक्षा चांगलं येतं.’’ अशी सुरवात होते. नंतर ‘‘स्वतःच करायला मी मुळीच परवानगी देणार नाहीये. काहीतरी घोळ करशील, लागून घेशील’’ म्हणजे मदत न घेणं हा आधी मूर्खपणा, उपकाराची जाणीव नसणं असं वाटतं आणि नंतर तो गुन्हा, पाप व्हायला लागतं.
रिमांड होममधल्या अनेक गोष्टी आठवून बघा, मतिमंदांच्यासाठीच्या संस्था, रशियन पोलीसांच्यावरचे मानसोपचार वगैरे. वरती आणि या गोष्टी तुमच्या भल्यासाठीच असतात म्हणजे नरकात जावं लागू नये म्हणून आत्ताचं दुःख, त्रास हा सहन करायलाच हवा.
मदत करण्यासाठी जे केलं जातं, ते चांगलं, निःस्वार्थी आणि सक्षम असेल याची खात्री कशी करणार? त्या मदतीचं रूपांतर पिळवणूक, जुलूम हुकूमशाहीत कशावरून होणार नाही? सगळेच काही असे नसतात. बरेचदा ही साधीच माणसं असतात. दुसरे लोक चुका करतील म्हणून त्यांना काळजी वाटते. त्यांना वाटतं ‘खूप काळजी घेतली की त्यांना चुका करण्यापासून वाचवता येईल. जर अशी ताकद आपल्याला असेल, तर ती वापरणं हे आपलं कर्तव्य आहे, अधिकारही आहे.’ पण प्रत्येकाला चूक करण्याचा हक्क आहे हे आपण विसरतो.
दुसर्याचला कोणतीही चूक करण्यापासून वाचवण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे दुसर्याचला ‘गुलाम’ करणं. म्हणजे आणखीही एक फायदा होतो, मग तुमच्या लहरी चुकांविरूद्धही त्याला काही म्हणता येत नाही.