माझी शाळा मराठी शाळा

भाऊसाहेब चास्करांशी बातचीत. भाऊसाहेब नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत कार्यरत असून, अ‍ॅक्टीव्ह टीचर्स फोरमचे संयोजक आहेत. आंध्रप्रदेश सरकारने नुकताच राज्यातील सर्व सरकारी शाळा सहावीपर्यंत इंग्रजी माध्यमात बदलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अकोले तालुक्यातील अनेक मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांतील Read More

सांगायची गोष्ट

पूर्वापार मी गोष्टी सांगत आलेलो आहे. गोष्ट सांगणं, माझ्या रक्तातच आहे. माझ्या आजोबांकडून मिळालेला तो वारसा आहे, मी घेतलेला वसा आहे. आजोबांनी मला गोष्टींचा खजिना दिला, त्यात अनेकांनी भर घातली. क्वचित भेटणाऱ्या एखाद्या फकिरानं, तर कधी रोजच्या शेजाऱ्यानं, मला एखादी Read More

रंगीत गंमत

‘‘आई, आई ताईंनी सांगितलंय उद्या शाळेत पावसात भिजायचं आहे, तू शाळेत माझे कपडे दिलेस ना गं ताईंना!’’ निम्मो शाळेतून आल्या आल्या आईला विचारायला लागला. अगदी आत्ताच व्हॅनमधून उतरल्यापासून त्याला आईला काहीतरी सांगायचं होतं. आई हो म्हणाली तेव्हा त्याचं समाधान झालं. Read More

म्युझिशिअन रेनच्या शोधात

सकाळचे साधारणपणे पाच वाजले होते. सगळीकडे मिट्ट काळोख. या काळोखात अंतराच्याच घरातले दिवे जळत होते. अ‍ॅमेझॉनच्या त्या घनदाट जंगलात घरातून बाहेर पडणारा तो प्रकाश अगदी काजव्याइतका वाटे. हळूहळू सूऱ्याचा प्रकाश येत होता. जंगल इतकं घनदाट, की प्रकाश यायला बराच वेळ Read More

भाकर

भयाण थंड अशी ती काळरात्र कशीबशी संपली. सूऱ्याची कोवळी किरणं सर्वदूर पसरली. फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या त्या दोन बायका शेतात आल्या. पिवळी फुलं लगडलेल्या मोहरीच्या झाडांना थंडीनं बधीर करून टाकलं होतं. दोघी चूपचाप मोहरीची पानं तोडू लागल्या. दवानं भरलेली ती पानं Read More

रामायणे 300 की 3000

भारतभरातच नव्हे, तर जगभरात अनेक रामायणकथा प्रचलित आहेत. त्या-त्या कथेचे वेगळेपण घेऊन ती येते. प्रत्येक कथेचा नायक म्हणून वेगळी व्यक्तिरेखा असू शकते. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीच्या सर्गात राम आणि त्याची वंशावळ यावर भर आहे. विमलसुरींच्या जैन रामायणात आणि थाई रामकथेत रावणाच्या Read More