अक्कामावशीचं पत्र

चिनूची अक्कामावशी तिच्या आजोळी, कर्नाटकातल्या एका छोट्याशा खेड्यात राहायची. चिनूची आणि तिची भेट सुट्टीतच व्हायची. त्या भेटल्या की मावशी तिला वर्षभरात घडलेल्या गोष्टींबद्दल हातवारे करून सांगायची. ‘ही गाय गाभण आहे, मामाचं आता लग्न आहे, माझं डोकं दुखत होतं तर मला Read More

तरंग

मोबाईल आता स्विच ऑफ झाला होता. चार्जर आत होतं, त्यामुळे इच्छा नसताना नीरव उठला आणि आत गेला. आई स्वयंपाकघरातच राधाचा अभ्यास घेत होती. नुकतीच जेवणं झालेली, त्यामुळे आवरत होती सगळं. बाबांनी नेहमीप्रमाणे बडीशेप घेतलेली आणि बाहेर गॅलरीत जाऊन बसले होते Read More

झॉपांग भॉतांग

मूळ बंगाली कथा कोणे एके काळी, एक कोल्हा आणि त्याची बायको आपल्या तीन पिलांना राहण्यासाठी गुहा शोधत हिंडत होते. ते खूप काळजीत पडले होते. गुहा शोधली नसती, तर पावसात भिजून-भिजून पिलांचा जीव गेला असता. शेवटी एक गुहा सापडली; पण गुहेबाहेर Read More

खजिना

समुद्राच्या किनाऱ्यावर तिचं घर होतं. आणि त्याचंसुद्धा. दोघांच्याही घरात कायम समुद्राची गाज ऐकू यायची. खिडकीतून पाहिलं की तिला लाटा दिसत. आणि त्याला होड्या. त्यांना एकमेकांची ओळख नव्हती. मुळीसुद्धा. रोज संध्याकाळी ती आईबरोबर समुद्रावर जायची. कुणीकुणी भेटायचं, गप्पा व्हायच्या. हिचा वाळूत Read More

आणि महेश खूश झाला

महेशच्या डोक्याआधी त्याचे हात चालतात, मग डोकं चालतं आणि नंतर त्या दोन्हीमागे त्याचे पाय जातात. म्हणजे असं, की त्याचे हात सारखं काहीतरी शोधत असतात. झाडावरून गळून पडलेली फुलं, पानं, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या, वाणसामानाच्या कागदी पुड्यांना गुंडाळलेला दोरा, वायरींचे तुकडे, बटणं, Read More

टिंकू

सकाळी असो की दुपारी असो, झोपेतून उठल्यावर डोळे उघडण्याआधी पहिलं भोकाड पसरायचं असतं, असं टिंकूला वाटतं. त्याशिवाय तो जागाच होत नाही. आजही टिंकू सकाळी मिटलेल्या डोळ्यांनीच उठला. उठला म्हणजे उठून अंथरुणावरच बसून राहिला. मग नेहमीप्रमाणे त्यानं गळा काढला. आई अंघोळीला Read More