मूल (आत्ता) का नको?

आई बाप व्हायचंय? लेखांक ३ – डॉ. प्रतिभा कुलकर्णी गर्भपात ही आजच्या काळात तशी सोपी बाब झालेली आहे, त्यामुळे असा निर्णय घेताना अनेकदा फारसा विचार केला जात नाही. बाब सोपी असली तरी ती आपल्या शरीराशीच जोडलेली आहे, औषधाचे, शस्त्रक्रियांचे काही Read More

होते कुरूप वेडे….

अस्मिता देशपांडे प्रत्येकाच्या जवळ क्षमता-अक्षमतांचं एक आपापलं गाठोडं असतं. परिस्थितीनुसार ह्यातल्या काही अक्षमता संपतात, तशा काही क्षमता आपल्याला सोडूनही जातात. कुठल्याही आयुष्यात असं काही ना काही घडतच असतं. पण या सगळ्याहून महत्त्वाचं आहे ते आपलं आपल्या ह्या गाठोड्याकडे पाहणं, त्यातल्या Read More

दिवस असा की

फारूक काझी मुलांना शिकवणं हे आपलं स्वत:चंही शिक्षणच असतं. मुलांना शिकताना मजा यावी, सहज शिक्षणाचे आनंद क्षण त्यांच्या वाट्याला यावेत म्हणून प्रयत्न करणार्‍या शिक्षकाचाही प्रत्येक दिवस मग सकारात्मक सर्जनानं भरून पावतो. हे उमजणार्‍या शिक्षकांनी त्यांचा हा आनंदाचा ठेवा आपल्यासमोर मांडला Read More

मार्च २०१२

या अंकात… संवादकीय – मार्च २०१२ सकस, समृद्ध लोकशाहीसाठी मूल (आत्ता) का नको ? होते कुरूप वेडे…. दिवस असा की Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

मला कवडसे हवे आहेत

– वैशाली गेडाम, चंद्रपूर आमच्या लहानपणी आम्ही वेळ ओळखायचो सावलीवरून. घराच्या सावलीवरून आढ्याच्या सावलीवरून कुंपणाच्या सावलीवरून विहिरीच्या सावलीवरून अंगणातील झाडावरून अन् स्वतःच्याही सावलीवरून. आमच्या लहानपणी आम्ही वेळ ओळखायचो उन्हावरूनही. घराच्या दरवाजातून हळूच प्रवेश करणार्या सकाळच्या कोवळ्या उन्हावरून अन् दुपारी घराच्या Read More

मूल हवं – कशासाठी?

डॉ. प्रतिभा कुलकर्णी स्त्रीस्वास्थ्य तज्ज्ञ – प्रसूतीशास्त्रतज्ज्ञाच्या भूमिकेतून समोरच्या जोडप्याचं बोलणं, विचार समजून घेण्याचा मी प्रयत्न करत राहते. एक ‘नैसर्गिक ऊर्मी’ म्हणून मूल हवं असतं का? ….. गौरी – ३२ वर्षांची आधुनिक, चटपटीत तरुणी आणि तिला साजेसाच समीर. दोघंजणं माझ्याकडं Read More