शाळेतलं पुस्तक
नुएमन सहीरचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. अभिमानानं वडिलांचा हात धरून तो चालत शाळेत निघाला होता. जवळजवळ त्यांना ओढतच नेत होता. नवा शर्ट, नवं दप्तर, नवी छत्री. अजून ती उघडलीसुद्धा नव्हती एकदाही. बसस्टॉपपासून तर तो उड्या मारतच शाळेत पोचला, अगदी खूश Read More
