मूल हवे – अट्टहास हवाच का? ( आई बाप व्हायचंय? लेखांक – ६ )

डॉ. प्रतिभा कुलकर्णी मूल हवंसं वाटणं ही नैसर्गिक व मानवी गोष्ट. पण मूल होत नसेल, तर तो जीवनमरणाचा प्रश्न का व्हावा? तंत्रज्ञान तर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं काढायला धावत राहतं, पण त्या उत्तराबरोबर आपण कुठेकुठे वाहावत चाललोय, याचं भान ठेवायला नको Read More

‘अशी’ शाळा कुटं वं भेटंल? (कविता)

मेधा टेंगशे मॅडम, तुमच्याकडची धुन्या-भांड्याची कामं माज्याकडनं, कशी फुलं फुलल्यावानी व्हत्यात – येता-जाता माज्या लेकीची इच्यारपूस करता आन् च्याचा कप देता, हातात ! तुमी म्हंता, ‘बाई, लेकीला शिकवा… आपली आपल्यावर धरील ती सावली ! न्हाय येनार रस्त्यावर, जरी न्हवर्यारनं गुत्त्याची Read More

ऑगस्ट २०१२

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१२ जगणे की चैतन्यपूर्ण जीवन व्यतीत करणे ? (छाया दातार) बालपण चित्रकार बापासोबतचं काय करू नि काय नको सॉरी बाई, आम्ही चुकलो मुलांना आता मारता येणार नाही Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१२

शिक्षणहक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासगटातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवण्याबाबतच्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं, त्यावेळी त्याचं स्वागत करून त्याच्याविषयी ऊहापोह करणारा लेख आणि संवादकीय मे २०१२ च्या पालकनीतीत आपण वाचलेलं आहेच. खाजगी शाळांच्या प्रस्थापित अभिजनवादी दृष्टिकोनाला (स्वत:ला Read More

जगणे की चैतन्यपूर्ण जीवन व्यतीत करणे? (छाया दातार)

माझं काम माझं पालकपण -लेखांक-१ मागील वर्षी खर्‍या अर्थाने निवृत्त झाले, वयाच्या ६७ व्या वर्षी. छोटी मोठी कामे घेतली आहेत, पण मनाचा स्वस्थपणा आहे आणि म्हणून मागे वळून बघायला आवडेल. प्रश्न आहे, ‘जगण्याचे सार्थक कशात आहे?’ बुध्दाला हा प्रश्न वयाच्या Read More

बालपण चित्रकार बापासोबतचं

दिलीप चिंचाळकर दिलीप चिंचाळकरांचे वडील म्हणजे प्रख्यात चित्रकार विष्णू चिंचाळकर, चिंचाळकर गुरुजी म्हणून ते ओळखले जातात. वयाच्या चाळिशीपर्यंत त्यांना कलाजगतातील अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कलेचं माध्यम म्हणून निसर्गाची निवड केली आणि रंगांचा त्याग केला. पुढचं सारं आयुष्य त्यांनी Read More