REFUGEE 

When I was born

My mother said

you are a refugee.

Our tent on the roadside

smoked in the snow.

 

On your forehead

between your eyebrows

there is an R embossed

my teacher said.

 

I scrubbed and scrubbed,

on my forehead I found

a brash of red pain.

 

I am born refugee.

I have three tongues,

The one that sings

is my mother tongue.

 

The R on my forehead

between my English and Hindi

the Tibetan tongue reads:

RANGZEN

Freedom means Rangzen

तेनजिन त्सुंदे  (Tenzin Tsundue)

 

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, जगभरात दर मिनिटाला 20 लोक युद्ध, छळणूक किंवा दहशतीपायी आपले सर्वस्व सोडून पळ काढतात. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितविषयक उच्च आयुक्तांच्या कार्यालयाने 1951 साली ‘निर्वासित’ ह्या शब्दाची व्याख्या केली. त्यानुसार ‘एखाद्या व्यक्तीला तिचा वंश, धर्म, देश, एखाद्या विशिष्ट समाज-गटाशी असलेली बांधिलकी किंवा आपली   राजकीय मते या कारणांमुळे छळ होईल अशी साधार भीती वाटल्याने आपल्या देशाबाहेर असलेली व्यक्ती म्हणजे निर्वासित.’ पुढे ही व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे  जीवनस्थिती गंभीरपणे बिघडलेली व्यक्ती निर्वासित मानली गेली. 

 तेनजिन त्सुंदे हा कवी, लेखक आणि तिबेटी कार्यकर्ता आहे. त्याचा जन्मही तिबेटमधला नाही, आणि तो कधी तिबेटला गेलेलाही नाही. त्याच्या जन्माच्या बरेच आधी 1959 साली त्याच्या पालकांना चीनकडून होणार्‍या छळाच्या भीतीने तिबेट सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. त्यांच्यासारखे अनेकजण तेव्हा भारतात आले. उदरनिर्वाहासाठी त्यांना रस्ते-बांधणीच्या कामावर मजुरी करावी लागली. इथला उन्हाळा सहन न होऊन शेकडो लोक मरण पावले. जगले-वाचले ते हालअपेष्टा सहन करत राहिले. तेनजिनचा जन्म 1975 साली रस्त्याकडेला बांधलेल्या एका तंबूत झाला. त्याची जन्मतारीख त्याच्या आईलाही सांगता येत नाही. ‘सगळे थकले-भागलेले आणि भुकेले असताना जन्मतारीख कोण नोंदवून ठेवणार!’ असे तिचे म्हणणे. पुढे त्याने हिमाचल प्रदेशात निरनिराळ्या ठिकाणी शालेय शिक्षण घेत चेन्नईला आणि पुढे मुंबई विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतले. विद्यार्थीदशेपासूनच तो तिबेटच्या स्वातंत्र्य-चळवळीशी जोडलेला आहे. त्यानंतर सातत्याने त्याचे नाव चर्चेत राहिले आहे. तिबेटला मुक्त करण्यासाठी झगडत राहण्याच्या प्रतिज्ञेचे प्रतीक म्हणून 2002 सालापासून तो डोक्याला लाल पट्टी बांधतो. तिबेट मुक्त होईपर्यंत ती न काढण्याचा त्याचा संकल्प आहे. 

हजारो तिबेटी निर्वासितांचा आवाज असलेल्या तेनजिनला आपला शेवटचा श्वास तिबेटमध्ये घेण्याची इच्छा आहे.