खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम टप्पा होता. खाद्यपदार्थांचे दहा स्टॉल्स होते. आकाश कंदील, पणत्या यांच्या बरोबरच बाहुल्या, चित्रांच्या फ्रेम्स, दागिने, भिंगऱ्या, फ्लॉवर पॉट, लेझर कट करून बनवलेल्या वस्तू अशी धमाल व्हरायटी होती. पाहुणे, पालक आणि स्वतः मुलं यांनी भरपूर खरेदी केली. आता नफ्या – तोट्याचा हिशोब होईल, आवराआवरी होईल आणि मग दिवाळीची सुट्टी सुरू होईल! या सगळ्याच्या मागे खेळघराच्या कार्यकर्त्यांची अपार मेहनत होती. म्हणूनच हा आनंद सोहळा छान पार पडू शकला.आवर्जून भेट देऊन गेलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभार!

पुढल्यावेळी अधिक तयारीने आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू.

https://youtube.com/shorts/ANUAIh_uVmQ