खेळघर फिल्म…

पालकनीती परिवार, खेळघर १९९६ साली ‘पालकनीती परिवार’ या न्यासाची स्थापना झाली. वंचित मुलांनाही आनंदानं शिकण्याची, मोकळेपणानं व्यक्त होण्याची संधी मिळावी यासाठी खेळघर या उपक्रमाची या संस्थेच्या माध्यमातून सुरूवात केली. शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं ह्या दिशेने काम करणारी ‘खेळघर’ ही एक अर्थपूर्ण रचना आहे. खेळांतून मिळणाऱ्या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुलं शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो. हे काम आपल्याला समजावं आणि आपणही या कामात सामील व्हावं यासाठी या खेळघर फिल्मची मदत होईल !