गावात पसरला आनंदी आनंद

Gavat_Pasarla_Aanand1एक छोटंसं गाव होतं. गावात पहिली ते आठवी शाळा होती. आणि शाळेच्या बाजूला एक देऊळही होतं. पावसाळ्याच्या तोंडाशी गावकर्‍यांनी शेतात पेरणी केली.

खूप दिवस तसेच कोरडे गेले; पाऊस पडलाच नाही. गावातल्या जाणत्या लोकांनी एकत्र बसून विचार केला आणि ठरवलं, की आपण गावात रामायणाचं पठण करूया; त्यामुळे पाऊस पडेल. मग त्यांनी घरटी वीस रुपये वर्गणी जमा केली. रामायणाचे पाठ पूर्ण झाल्यावर जमलेल्या पैशातून गावात प्रसाद वाटला; पण पाऊस काही पडला नाही.

मग ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत त्यांनी गावात धोंडी काढली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. गावातल्या शिक्षकांनी लोकांना सांगितलं, की रामायणाचे पाठ करून किंवा धोंडी काढून पाऊस पडणार नाही. त्यासाठी जास्तीतजास्त झाडं लावावी लागतील. गावकऱ्यांना त्यांचं म्हणणं पटलं. त्यांनी गावात खूप झाडं लावली, त्यांची निगा राखली.

Gavat_Pasarla_Aanand2

दुसऱ्या पावसाळ्यापर्यंत ती झाडं मोठी झाली. चांगला पाऊस झाला, शेतं पिकली, अन्नधान्य मिळालं, ते विकून शेतकर्‍यांना पैसेही मिळाले. एवढंच नाही, तर झाडांमुळे गावकर्‍यांना शुद्ध हवाही मिळाली. सगळीकडे आनंदीआनंद पसरला. सगळ्यांनी शिक्षकांचे आभार मानले. शेतातला मका, काकडी अशा वस्तू ती माणसं आपल्या मुलांबरोबर शिक्षकांसाठी शाळेत पाठवू लागली. सगळी माणसं गावात एका ठिकाणी जमली आणि नृत्य करत आनंद व्यक्त करू लागली.

 

तेजस्विनी बुवाडे

शा. मा. शाळा, पेंडोनी, जि. छिंदवाडा (म.प्र.)