चंद्राला हात लावला

पृथ्वीवरून रॉकेट चंद्राकडे जात होते. रॉकेटने चंद्राला धडक दिली. चंद्र गोल फिरत पृथ्वीवर येऊ लागला. तो लातूर जिल्ह्यात बोरगाव काळे या गावामध्ये येऊ लागला.

मी त्याला म्हणालो, ‘‘अरे चंद्र, वरीच उड. नाहीतर आमची घरे तुटतील. आम्ही मरून जाताल.’’

‘‘अरे तू कोण आहेस बरं.’’

‘‘बरं झालं तू उडालास. अरे तूपण बोलतोस?’’

‘‘हो रे, मीपण बोलतो. कधीतरी मी तुला जवळून पाहिले. अरे, पण तुझे नाव काय?’’

‘‘चांदोबा, माझे नाव सुमित आहे.’’

‘‘खूप छान नाव आहे. अरे, इथे कोण आहे?’’

‘‘अरे, तो खंडूभय्या आणि त्याचं कुत्रं आहे.’’

‘‘अरे, कुत्रं म्हणजे काय?’’

‘‘कुत्रं म्हणजे चार पायाचं आसतंय. चोर आल्यावर घराची राखन करतय. अरे, तू किती लांब आहेस, तरीपण तुला माझा आवाज यायलाय.’’

‘‘अरे, माझे कान मोठे आहेत म्हणून मला तुझा आवाज येऊ लागला आहे.’’

‘‘अरे चंद्रा, मला तुला शिवायचं आहे.’’

‘‘सुमित, मी कसा येऊ. मी खाली आल्यावर सगळे घर तुटतील.’’

‘‘अरे चंद्रा मी त्या टाकीवरून चढतो आणि तुला शिवतो.’’

‘‘अरे सुमित, पडशील.’’

‘‘नाही पडत. मी वरीपर्यंत गेलो चंद्रा.’’

‘‘अरे शिव मंग मला.

‘‘शिवलं की मला पोळल्यासारखे वाटले रे चंद्रा. हा सूऱ्याचा प्रकाश होता तर.’’

‘‘जाऊ सुमित? टा-टा.’’

‘‘टा-टा.’’

 

सुमित बप्पा सिंधू सोनवणे  | इयत्ता सहावी

जि.प.प्रा. शाळा,  बोरगाव काळे, जि. लातूर