झाड मेले

एक वेळ आमच्या गावात लय जोराचा तुफान आला. विजा गिन (वगैरे) तर मस्त कडकडत होत्या.

एक वीज पडली चिचेच्या झाडावर.

झाड रस्त्याले लागून होतं.

त्याच्याखाली तीन ट्रॅक्टर, सात गाड्या, एक ट्रक उभा होता.

झाड पडला.

समद्या गाड्या चकनाचूर झाल्या.

बहुत मोठा झाड होता.

रस्ता पुरा बंद झाला.

सकाळी सगळे उठले अन् पोतं, थैल्या, टोपल्या गिन त घेऊन झाडांकडं गेले.

मीबी गेलो आईसंग, माझी शाळेची पिवशी घेऊन.

लगीत (खूप) चिंचा पडल्या होत्या, लगीत झाडले लागून बी होत्या, समद्या लोकायनं त्या तोडल्या, एकबी नाही ठेवली.

सारा गाव चिंचेभोवती गोळा झाला होता. मग सगळे निघून गेल्यावर डोजर गाडी आली अन् झाड बाजूले सरकवला.

जा-यासाठी रस्ता झाला.

काही लोकायनं कुर्‍हाडी आणल्या होत्या, झाडाचे तुकडे तुकडे करून टाकले.

झाड मेला….

आता त्या जागी सावली नाही.

 

श्रावणी प्रकाश मडावी  | इयत्ता चौथी

जि.प.प्रा. शाळा, आवाळपूर