रस्ता….2

‘रस्ता’ याच पुस्तकाला धरून 2 किंवा 3 सत्र मिळून दृश्यकलेसंदर्भात काम केले. असे करण्याने मुलांना ठेहरावाने विचार करण्याला छान वाव मिळतो. स्वतःत आणि चित्रात अधिक खोल जाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होते. Artsparks फाउंडेशन कडून झालेल्या टीचर ट्रेनिंग प्रोग्रामच्या शिक्षण पद्धतीवर आधारित या सत्रांचं नियोजन केलं होतं.पहिल्या दिवशी वस्तूंचे पोत आणि पॅटर्न याबद्दल पुरेसा चैत्रिक अनुभव दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी रस्ता असेल असे A4 आकाराचे अनेक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स मुलांसमोर मांडले. त्यात विविधता असेल याची काळजी फोटो निवडतानाच घेतली होती. मुलांनी आपापल्या आवडीने फोटो निवडून शक्य तितक्या निरीक्षण पूर्ण ही चित्रे बघून कागदावर काढायची होती. फोटोवर चर्चा करुन झाल्यावर चित्र कशाप्रकारे काढता येईल या बद्दलचं सहभागी पद्धतीने प्रात्यक्षिक दिलं. चित्र काढून बघून त्यात बदल करण्याची मुभा मुलांना होती मात्र खोडरबर न वापरता. फोटोत असणाऱ्या झाड,डोंगर, रस्ता, शेत, असल्यास प्राणी, रस्त्याचरचे दिवे, समुद्र अशा अनेक गोष्टी मार्क करुन घ्यायच्या आणि त्यात आदल्या दिवशी तयार केलेले पॅटर्न्स भरायचे. हे करताना अनेकच गोष्टींचा कस लागतो. चित्रातल्या गोष्टींना साजेसे असे पॅटर्न बनवणे आणि कुठल्या पॅटर्न च्या शेजारी काय केल्यास चांगले दिसेल याची अटकळ बांधत पुढे जाणे. पॅटर्न आणि मग चित्र संपूर्ण होईपर्यंत धीराने ते करत रहाणे. आठवी प्रमाणेच ९वी १०वीच्या मुलांसाठीसुद्धा याचप्रकारे परंतु कठिण्य पातळी वाढवून हीच activity घेतली. यावेळी माध्यम जरा बदलले. काळ्या कागदावर पांढऱ्या पेन्सील. (white glass-marking pencil) शिवाय या गटाला फोटोच्या दुप्पट आकाराचे चित्र काढायचे होते. हे काम तीन दिवसात विभागून केले. झालेली चित्रं समोर ठेवून त्याबद्दल आवर्जून संवाद केला.पेन्सिल/ पेन हाताळण्यापासून टप्प्याटप्प्याने एकेक गोष्ट करत गेल्याने आणि विषयात व माध्यमात पुरेसं नाविन्य आणल्याने मुलं रमत गेली. बहुतांश मुलांनी या सगळ्या प्रक्रियेचा चांगला आस्वाद घेतला. टीप: याचा पूर्वार्ध मागच्या पोस्ट मध्ये आहे. तोही जरूर वाचावा.#पालकनीती_परिवाराचे_खेळघर_पुणे#palakneeti#artsparks_Foundation

All reactions:3333