सांगोवांगीच्या सत्यकथा: शशि जोशी

स्वत: पासून आरंभ करा

एका बिशपच्या थडग्यावर खालील शब्द लिहिलेले होते.

‘मी जेव्हा तरुण होतो, स्वतंत्र होतो, माझ्या कल्पनाशक्तीला मर्यादा नव्हत्या. तेव्हा मी जग बदलण्याची स्वप्ने पाहिली. मी जसा मोठा झालो अन् थोडा शहाणा झालो, माझ्या लक्षांत आले की जग बदलणार नाही, तेव्हा मी थोडं / जवळपास पाहिले आणि माझा देशबदलायचा विचार केला.

पण तो सुद्धा बदलाला अनुकूल दिसला नाही. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी माझ्या कुटुंबाला बदलायचे ठरवले. कुटुंब माझे जवळचे होते, पण ते तर ऐकूनच घ्यायला तयार नव्हते.

आता मी जेव्हा माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतो आहे, तेव्हा माझ्या अचानक लक्षात येतेय की मी जर प्रथम मला स्वत:ला बदलले असतेतर ते उदाहरण देऊन मी माझ्या कुटुंबाला असते. त्यांच्या स्फूर्तीने अन् प्रोत्साहनाने मी माझा देश बदलू शकलो असतो आणि कदाचित, कुणी सांगावे, मी कदाचित जग पण बदलले असते.’