आदरांजली

Shantabai_Ranade

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. शांताताई रानडे ह्यांचं ह्या महिन्यात वृद्धापकाळाने निधन झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या. सर्व लोकशाहीवादी आंदोलनांमध्ये त्या सहभागी असत. रशियन भाषेच्या अभ्यासक असलेल्या शांताताईंनी अनेक पुस्तिका लिहिल्या तसेच पुस्तकांचे व लेखांचे नियमितपणे अनुवाद केले आहेत.

 

anil-bhagavatवैवाहिक समुपदेशन, पालक-कार्यशाळा आणि दैनंदिन आयुष्यातील व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भागवत ह्यांचं नोव्हेंबर महिन्यात निधन झालं. जीवनसाथ अभ्यास मंडळ आणि वैवाहिक समुपदेशन केंद्र चालवताना त्यांनी युवकांना नेहमीच व्यापक समाजाचा विचार करायला शिकवलं. पालकनीती सुरू झाल्यानंतर दुसर्‍याच अंकाचं (फेब्रुवारी, 1987) प्रकाशन शोभाताई आणि अनिलदादा यांच्या हस्ते झालं होतं.

 

शांताताई व अनिलदादांना पालकनीती परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.