प्रतिसाद – डिसेंबर १९९८

मी आपला दिवाळी अंक ‘पालकनीती’ 1998 वाचला. त्यामध्ये ‘माहितीघर’ याबद्दल वाचले. ‘माहिती देणे व घेणे’ हा माझा छंद आहे त्यामुळे मी आपणास ‘Dyslexia’ या विषयावर काही माहिती कळवित आहे.

‘डिस्लेक्शीया’ हा शब्दकोषांतील शब्द आहे. त्यामुळे हा तसा काही नवा शब्द नव्हे. पण साधारण 3  ते 4 दशकापूर्वी शिक्षणात आजच्या प्रमाणे स्पर्धा नव्हती. त्यामुळे त्यावेळी शिकलेल्या विद्यार्थ्यांत असे विद्यार्थी असतील पण पालकांना व समाजाला त्यांची जाणीव झाली नाही. पण आज गुणवत्ते शिवाय उच्चशिक्षण नाही व उच्चशिक्षण नाही म्हणून अर्थप्राप्ती कमी हा प्रश्‍न पालकांना भेडसावित आहे. आईवडील हुशार, मुलगा एकच पण तो शाळेतील परिक्षेत कमी गुण मिळवितो. मुलगा उनाड आहे का? अभ्यास करीत नाही का? मतिमंद आहे का? नाही. कोणतेही शारीरिक व्यंग नाही. आज्ञाधारक, नियमित शाळेत जाणारा. अभ्यासू, तत्पर, आईवडिलांवर श्रद्धा असणारा, मग शालेय परिक्षेत कमी गुण का? या स्पर्धात्मक काळात याचे कसे होणार? या काळज्या पालकांना सतावतात. मग मानसतज्ञ, मार्गदर्शक, बुद्ध्यांक चाचणी व त्यावरील विश्‍लेषण यावरून पालकांना समजते की आपला मुलगा ‘Dyslexic’ आहे. याला काहीजण गतीमंद, low learner किंवा learning disability  म्हणतात.

‘ब्रिटीश डिस्लेक्सीक असोसिअशन’ यांनी याबद्दल खूप माहिती उपलब्ध करून दिली आहे.

What is dyslexia?

‘Dyslexia is a specific  learning difficulty that hinders the learning of literary  skills. This problem with Managing Verbal Codes in memory is neurologically based and tends to run in families. Other symbolic systems such as mathematics and musical notations can also be affected. 

Dyslexia can occur at any level of intellectual ability. It can accompany, but lest is not a result of, lack of motivation, emotional disturbances, sensory impairment or meagre opportunities. The effects of dyslexia can be alleviated by skilled specialist teaching and committed learning. Moreover many dyslexic people have visual and spatial abilities that enable them to be successful in a wide range of careers.

मी एक आजोबा आहे. पेशाने शिक्षक नाही वा मानसतज्ञ नाही. माझा एक नातू काही प्रमाणात Dyslexic होता. त्यासाठी मीच त्याला दहावीच्या परिक्षेपर्यत शिकविले व त्यानेही झटून अभ्यास केल्याने तो प्रगती करून 67 % टक्क्यांपर्यत आला. त्यामधील हा दोष आज जवळ जवळ नाहीसा झाला आहे. साधारणपणे अशी मुले 50 ते 55% टक्क्यापर्यंत गुण मिळवितात पण ते आत्मविश्‍वासपूर्वक सांगू शकत नाहीत. निकाल लागेपर्यंत काळजीत. पण याच्या बाबतीत प्रत्येक पेपरात तो छातीठोक सांगत असे व त्याप्रमाणे त्याला विषयात 2 ते 3 गुण कमी जास्त मिळाले. त्यासाठी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल अशा पद्धतीने त्यांना शिकवावे लागते. ही प्रक्रिया किचकट आहे. त्यासाठी एक विद्यार्थी एक शिक्षक ही पद्धत अवलंबावी लागते. तसेच शाळेत शिकवलेली प्रत्येक नवीन संकल्पना त्याला चांगल्या प्रकारे समजेपर्यत

4/5 वेळा शिकवावी लागते. मगच हा आत्मविश्‍वास येतो.

यासाठी पालकांनी स्वत: वा योग्य शिक्षकानी शिकविण्याची जरूरी असते. म्हणजे मुलांची गती वाढते व ती सर्वसाधारण विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवितात.

याशिवाय माझ्याजवळ या ‘ब्रिटीश डिस्लेक्सीक असोसिअशन’ कडून  मिळालेली इतर माहिती आहे. ज्या पालकांना याबद्दल जास्त माहिती हवी असेल त्यांना मी कळवू शकेन.

आपला,

गो.वि.लेले,

मुंबई.