महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांसाठी आवाहन : निर्माण

शिक्षण-नोकरी-निवृत्ती याहूनही वेगळं जीवनात काही असतं का? केवळ स्वतःचं घर पैशाने भरणं यापेक्षा अधिक अर्थपूर्ण जीवन शक्य आहे का? माझ्या कौशल्यांचा व क्षमतांचा मी समाजासाठी कसा उपयोग करू शकतो? अशा प्रश्नांमुळे अस्वस्थ असलेल्या युवांनी स्वतःचा व स्वतःच्या भवितव्याचा शोध घ्यावा यासाठी सुरू केलेली शिक्षण प्रक्रिया म्हणजे निर्माण ! ‘मी कशासाठी जगायचं’ याचं खरं उत्तर शोधण्याची शिक्षण प्रक्रिया म्हणजे निर्माण !
– १८-२६ वयोगटातील निवडक ७० तरुण-तरुणींसाठी; – सहा महिन्यातून एकदा अशी चार शिबिरांची मालिका; – प्रत्येक शिबिर सुमारे ७ – ८ दिवसांचे; – अनुभवात्मक शिक्षणावर भर; – समाजातील समस्यांचे प्रत्यक्ष दर्शन;
– तज्ज्ञांसोबत चर्चा, मार्गदर्शन व कार्य
शिबिरांचे ठिकाण : ‘शोधग्राम’ सर्च, गडचिरोली; संयोजन : डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि निर्माण टीम, ‘निर्माण’ची चौथी बॅच जून २०११ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे. सहभागी होऊ इच्छिणार्यां नी
http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरून प्रवेश अर्ज डाऊन लोड करावा आणि त्वरित ३१ डिसेंबर २०१० आधी पाठवावा.
अधिक महितीसाठी संपर्क –
उमेश खाडे – ९८९२६४९६६४;
दीपा देशमुख – ९५४५५५५५४०