बदलांना सामोरे जाताना …

Magazine Cover

झपाट्याने बदलणार्‍या परिस्थितीत पालकांना सततची चिंता असते – मुलांच्या शिक्षणाची. मुलांचं करिअर, आवडीचं क्षेत्र, अंगभूत गुणांचा विकास, नवी कौशल्यं, अभ्यासक्रम आणि त्याच्या बाहेरच्या हजारो गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो. आपलं मूल ह्या झंझावाताला बळी पडू नये आणि दुबळंही राहू नये ही तारेवरची कसरत करताना शिकलेल्या आणि न शिकलेल्या पालकांची सारी शक्ती खर्ची पडते. अशा वेळी मदत होते ती अभ्यासकांच्या विचारांची, अनुभवाच्या बोलांची.