आवाहन

प्रिय पालक,
मुलं वाढत असताना आपल्याला अनेक प्रश्नह पडतात आणि उत्तरं शोधणं कठीण होतं. असे प्रश्नण पालकनीतीला विचारा. उत्तर शोधलं असलंत तर तेही पाठवा. हे प्रश्नठ अनेकांना जवळचे वाटू शकतील. त्यामुळे हवं तर नाव जाहीर न करता त्याबद्दल चर्चा करता येईल.

शिक्षक मित्र मैत्रिणींनो,
वर्गात शिकवताना मुलांना आकलन नीट व्हावं, शिक्षण अनुभव आनंददायी व्हावा, यासाठी आपण अनेक प्रयोग केले असणार. काही जमले, काही फसलेही असतील. तसं का झालं हा विचारही तुम्ही केला असेल. तुमचे हे अनुभव पालकनीतीसाठी लिहून पाठवा.
संपादक