खेळघरातील ५ वी ते ७ वी ची मुले २० फेब्रुवारीला *Star Gazing* साठी वारजे टेकडी येथे गेली होती. हिवाळ्यात आकाश स्वच्छ असल्याने तारकांचे उत्तम निरीक्षण करता आले.
खेळघराच्या वॉल्यूएंटर अर्चन पाटील यांनी ही सगळे घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. ज्योतिर्विद्या प्रतिष्ठान (JVP ) यांच्यातर्फे ही सफर आयोजित करण्यात आली त्यांची टीम तयार होती मुलांसोबत ताऱ्यांची सफर करायला दोन टेलिस्कोप व पूर्वतयारी असल्याने टेकडी वर गेल्या गेल्या लगेच मुलांनी रांगेत उभे राहून चंद्रकोर बघायला सुरुवात केली. मुले इतकी उत्सुक होती की, एकदा बघून झाल्यावर पुन्हा पुन्हा बघण्याचा मोह त्यांना आवरत नव्हता. चंद्र पाहिल्यानंतर मुलांनी आपले अनुभव सांगितले सारंग दादांनी खूप मोलाची माहिती दिली:
चंद्राचे महत्त्व:- Moon या शब्दावरूनच Month शब्द कसा तयार झाला आणि १५-१५ दिवसांच्या फरकाने ३० दिवसांचा महिना कसा पूर्ण होतो हे त्यांनी सांगितले.
– पूर्वी कॅलेंडर नव्हते तेव्हा चंद्राची स्थिती बघूनच भाडेकरू भाडे द्यायला जायचे, हे ऐकून मुले थक्क झाली.
गुरू चे निरीक्षण (Jupiter): दुसऱ्या टेलिस्कोपमधून गुरू ग्रहावरील दोन पट्ट्या आणि त्याचे स्वतःचे ४ चंद्र स्पष्ट दिसत होते. पृथ्वीप्रमाणे इतर ग्रहांनाही चंद्र असतात, ही माहिती मुलांसाठी नवीन होती.
आर्द्रा नक्षत्र व व्याध: लेझर लाईटच्या साह्याने आर्द्रा, व्याध आणि लघुव्याध या ताऱ्यांनी बनणारा Winter Triangle मुलांनी ओळखायला शिकले.
मुलांना पडलेली प्रश्न:- एलियन आहेत का? प्लूटो हा ग्रह आहे की नाही? आपल्या आकाशगंगेला Milky Way का म्हणतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दादांनी दिली.
मिथुन राशीचा तारका समूह देखील पहिला… टेकडीचा परिसर मोठा असल्याने मुलांना तिथे खेळावेसे वाटत होते, पण सगळीकडे अंधार असल्याने सर्वांनी सँडविच चा आनंद घेतला. मार्गदर्शक गौरीताई आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी उत्तमरित्या मुलांना सोप्या पद्धतीने अशी रंजक माहिती दिली मुले इतकी रमली होती की त्यांना घरी जावं वाटे ना.
सपना राऊत ( ६-७ वी च्या वर्गाची खेळघर ताई )

