नमस्कार वाचकहो,
जानेवारी २०२६ पासून पालकनीती ऑनलाईन माध्यमातून दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहचत आहे. पहिल्या ऑनलाईन संवादात आपण दिवाळी अंक छापणार असल्याचं म्हटलं होतं. आपल्या ४० वर्षांच्या परंपरेनुसार ह्याही दिवाळी अंकातून आपल्यापर्यंत दर्जेदार साहित्य पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पूर्वी अस्तित्वात असलेली पोस्टाची वितरण-सवलत आता आपल्याला उपलब्ध नाही. अशा वेळी अंक कुरियर / स्पीड पोस्टने पाठवणं हा पर्याय चांगला. ह्यात अंक गहाळ होण्याचाही धोका नसेल.
आपण दिलेल्या पत्त्यावर आम्ही आपल्याला अंक पाठवू. अंकाची किंमत रुपये ३००/- असून पोस्टेजचा खर्च ५० रुपये, असे एकूण ३५०/- रुपये होतील. ह्यातच वर्षभराचे ऑनलाईन अंक आपणास ईमेलवर पाठवले जातील.
आपले मित्र-मैत्रिणी, नात्यातली पालक-मंडळी तसेच होऊ घातलेले पालक ह्यांना भेट देण्यासाठीही अंक घेता
येईल. अंकाची नोंदणी आम्ही सुरू करत असून त्यासाठी गूगल फॉर्म पाठवत आहोत. नोंदणी जरूर करा, शक्य
तितक्या लवकर करा ही विनंती. गूगल फॉर्म भरताना ज्यांना अंक भेट द्यायचा आहे त्यांचा पत्ता नोंदवल्यास
थेट त्यांनाच अंक पाठवता येईल.
गूगल फॉर्म उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
https://forms.gle/MoNfcLJnsNLh6ua3A
धन्यवाद!
कळावे,
संपादक,
पालकनीती
