गोष्ट जुनीच,पंचतंत्रातली!

‘जश्यास तसं’ ह्या भावनेने पेटलेल्या करकोच्यानं कोल्ह्याला घरी जेवायला बोलवून सुरईत सरबत प्यायला दिलं आणि आपल्याला ताटलीत जेवायला दिल्याची परतफेड केली. करकोच्याच्या लहानगीनं हे बघितलं. ‘कशी जिरवली कोल्ह्याची!’ असला घरातला विजयोन्मादी सूर ऐकतच ती मोठी होत होती. बरेचदा मोठ्यांच्या काही Read More

भय इथले संपत नाही…

वर्तमानपत्र हे सहसा समाजमनाचं  प्रतिबिंब असतं. बातम्या, संपादकीय, अभिप्राय, पुरवण्या, आणि घडामोडी असा  जो मजकूर दररोजच्या  वर्तमानपत्रांमध्ये छापून येतो, त्यातून  वाचकांच्या आणि पर्यायानं समाजाच्या आवडीनिवडी आणि प्राधान्यविषयांचं त्यात संपूर्ण नाही तरी काही प्रमाणात दर्शन घडतं. परवाच दिल्लीहून परत येताना मी Read More

‘आता बाळ कधी?’

शिक्षण – नोकरी – लग्न- मूल हा क्रम आपल्या अगदी ओळखीचा आहे. मात्र तो तसाच्या तसा पाळायचा, थोडासा बदलायचा का काही पायऱ्या गाळूनच टाकायच्या याचा विचार करणारी काही माणसं आताच्या काळात  आपल्याला भेटतात! समाजानं आखून दिलेला हा  क्रम पाळायच्या शर्यतीत Read More

बदलतं पर्यावरण, बदलतं पालकत्व

त्यांच्या घराबाहेरची वापरलेल्या डायपरची पिशवी बघून मला खूप संताप येत होता. हा संताप योग्य नाही असंही मी स्वतःला समजावत होते. योग्य नाही ते दोन कारणांसाठी, एक माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी आणि दुसरं मी असं दुसर्‍यांबद्दल ‘जजमेंटल’ असणं माझं मलाही आवडणारं नाहीय. Read More

मुलं, भाषा आणि आपले निर्णय

“माझी भाची चार आठवडे पुण्यात असणार आहे… तिला मराठी शिकवाल का?” असं मोठ्या वयाच्या भाचीसाठी कोणीतरी विचारलं. मला असणारा वेळ आणि ती भाची यासाठी काढू शकेल तो वेळ जुळण्याबद्दल सांगोपांग बोलणं होऊन वर्ग सुरू झाले. ती साधारण सतरा-अठरा वर्षांची होती. Read More

जंक फूड: एक आरोग्यबाधक सवय

प्रक्रिया केलेले तयार खाद्यपदार्थ विकत घेताना आपण त्याच्या पाकिटावरील लेबलकडे किंवा त्यावरील दाव्यांकडे कितपत लक्ष देतो?  समजा तसा प्रयत्न केला तरीसहसा ती माहिती आपल्या आकलनाच्या पलीकडे असल्याने खाताना आपण तिच्याकडे काणाडोळा करतो. आत्ताआत्तापर्यंत माझादेखील त्या किरट्या अक्षरात दिलेल्या पोषणतथ्यांबाबत हाच Read More