शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का?

वैशाली गेडाम मला आठवते, मी मसाळा तुकूम शाळेत असतानाची ही गोष्ट. आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेतील मुलांसाठी नवरत्न स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात हस्ताक्षर स्पर्धेपासून ते कथाकथन, एकपात्री वगैरे अशा नऊ स्पर्धा होत्या. दरवर्षी या स्पर्धा केंद्रस्तर Read More

खेळांतील स्पर्धात्मकता – एक शोध

डॉ. गोपाल शर्मा  खेळणे हे मुलांच्या जगण्याचे एक नैसर्गिक अंग आहे. त्यासाठी त्यांना काहीही चालते; दगड, माती, काड्या, लाकडे, अगदी घरातली भांडीसुद्धा. धावणे-पळणे, उड्या मारणे, गडबडा लोळणे, हे सगळे याच खेळाचे प्रकार असतात. त्यातून त्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होत जाते. Read More

सोलो कोरस

(पुस्तक परिचय) डॉ. राजश्री देशपांडे आपण आपल्या रोजच्या जगण्यात गुंतलेले असतो. घर-संसार, नोकरी-व्यवसाय, मुलेबाळे या सगळ्यासाठी करावी लागणारी यातायात, त्यातल्या अडचणी, नात्यांमधले तणाव, आजारपणे, आर्थिक ताण या सगळ्यासकट आपल्या दैनंदिन आयुष्याची चाकोरी सुरळीत चालू असते. स्वतःला आपण संवेदनक्षम, पुरोगामी वगैरे Read More

बोलूया धर्माविषयी

अरुणा बुरटे धर्म-जात या ओळखीशी निगडित दुरभिमान आणि द्वेषावर आधारित घटना, भेदभाव, तिरस्कार, गैरसमज, एकटेपणा, अन्याय, हिंसा, गुन्हे आणि अशी इतर घटितं यामधील वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. या देशात हिंदू धर्मीय बहुसंख्य असल्यानं हा देश ‘आम्ही म्हणू तसला’ ‘हिंदुराष्ट्र’ Read More

आदरांजली – सप्टेंबर २०२३

‘आजचा सुधारक’ ह्या विवेकवादी नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक दिवाकर मोहनी ह्यांचे मधल्या काळात निधन झाले. मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी स्त्री-स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे मोल इत्यादी विषयांवर लेखन केले. ‘माय मराठी कशी लिहावी, कशी Read More

उशीर – सप्टेंबर २०२३

ही गोष्ट आहे पालकनीतीच्या खेळघरातली. साधारण २००० सालाच्या सुमाराची. मी आठवीच्या मुलांचा इतिहासाचा वर्ग घेत असे. जिन्याच्या पायर्‍यांवर मुले बसायची. दोन जिन्यांच्या मधल्या जागेत खिडकीच्या खालच्या भिंतीवर फळा रंगवून घेतलेला होता. तिथे उभी राहून मी शिकवायचे. वसाहतीकरण, राज्य राष्ट्र वाद, Read More