हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए…

हो गई है पीर* पर्वत-सी पिघलनी चाहिए,

इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,

शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,

हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

स्रोत : पुस्तक : साये में धूप 

पीर* : समाजात अनेक प्रकारच्या विसंगती नजरेस पडतात. माणसे आपापसात ईर्ष्या करतात. एकमेकांचा दुःस्वास करतात. ह्यामुळे दुःख डोंगराएवढे मोठे झाले आहे. हे डोंगर वितळायला पाहिजेत. 

तेज़ी से एक दर्द

मन में जागा

मैंने पी लिया,

छोटी सी एक ख़ुशी

अधरों में आई

मैंने उसको फैला दिया,

मुझको सन्तोष हुआ

और लगा —

हर छोटे को

बड़ा करना धर्म है । 

स्रोत : पुस्तक : सूर्य का स्वागत

हिंदीतील एक नावाजलेले कवी आणि गझलकार दुष्यंत कुमार त्यागी (1931-1975) उत्तर प्रदेशातल्या बिजनौरचे होते. अलाहाबाद विश्वविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी भोपाळ आकाशवाणीवर काम केले. केवळ 44 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दुष्यंत कुमारांनी कवी, लेखक म्हणून अपार ख्याती मिळवली. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले आहे. 

‘साये में धूप’ हा त्यांचा गझलांचा संग्रह लोकप्रिय आहे. ‘सामान्य लोकांचा कवी’ अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कविता समाजासाठी कडू औषधासारख्या आहेत. चवीला कडवट असल्या, तरी हितकारक! ‘हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं’ सारख्या ओळींतून त्यांची अभिव्यक्ती संसदेपासून सामान्य सडकेपर्यंत सर्वत्र ऐकायला मिळते. ह्या ओळींची ताकद एवढी जबरदस्त आहे, की सामान्य माणसाला तो त्याचाच आवाज वाटतो. अनेक नव्या कवींचा ते प्रेरणा-स्रोत होते. लोकांचे अज्ञान, भीती, दुःख ह्यांवर आपल्या कवितांमधून दुष्यंत कुमार भाष्य करत असले, तरी त्यांनी आशावाद सोडला नव्हता. भ्रष्टाचार हाही त्यांच्या लेखनाचा एक मुख्य विषय असे. 

प्रख्यात कवी निदा फाजली त्यांच्याबद्दल म्हणाले होते, ‘‘दुष्यंतच्या डोळ्यात त्याच्या काळातील नव्या पिढीच्या मनात असलेला राग आणि संताप दिसतो. हा संताप राजकारणातील अन्याय आणि दुष्कर्मांविरुद्ध आहे. त्याची कविता समाजातील मध्यमवर्गीयांच्या भोंदूपणाऐवजी कष्टकरी वर्गाची मेहनत आणि त्यांच्या दयाळूपणाचे प्रतिनिधित्व करते.’’