Visual art

Visual art च्या म्हणजेच दृश्यकलेच्या मदतीने शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी, अर्थपूर्ण आणि बहुआयामी कशी करता येईल, मुळात दृश्यकला शिकवायची कशी या विषयी आर्टस्पार्क्स फाउंडेशन (Artsparks foundation) ही संस्था काम करते. प्रत्यक्ष काम, जन जागृती, आणि मुलांसोबत काम करणाऱ्या संस्थांमधल्या लोकांना ट्रेनिंग देणे अशा विविध पातळ्यांवर हे काम चालते. संस्था बंगलोरस्थित असून महाराष्ट्रातील काही संस्थांनी त्यांची प्रशिक्षणे घेतली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो आहे. या संदर्भाने नुकतीच एक ‘regional meet’ खेळघरात पार पडली. सागरिका आणि अनू अशा दोन जणी Artsparks मधून तर नाशिक, मुंबई व पुणे येथून इतर संस्थांचे सहभागी खेळघरात आले. त्यांनी ठसेकामाची Activity सगळ्यांसोबत घेतली. त्यासाठी कंगवा, बाटलीची टोपणं, टूथ पिक्स, बड्स, छोटे- चपटे लाकडी चमचे, कापसाचा बोळा, थर्माकोलचा तुकडा अशा वस्तू दिल्या होत्या. त्या कशा वापरून बघू शकतो याचं सहभागी पद्धतीने प्रात्यक्षिकही दाखवलं. भेंडी, बटाटा,हाताची बोटं या नेहमीच्याच साचेबद्ध वस्तूंपेक्षा या वस्तू वापरून ठसेकाम करणं, त्यातून पोत तयार करणं कसं वेगळं आहे हे आम्ही अनुभवलं. प्रत्येक क्षणी नवीन काही करुन बघण्याला वाव होता. एकमेकांचं बघून शिकण्याला वाव होता. दृश्यकलेच्या अनुभूतीतून शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेकडे जाण्याचा प्रवासही सगळ्यांनी अनुभवला. काही नवीन ओळखी तर काही नव्याने भेटी-गाठी झाल्या. त्या भेटीची ही काही क्षणचित्रे.#artsparks_foundation#palakneeti_pariwaar#Khelghar Pune+4