एका शिक्षकाची डायरी

किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत बसाल का प्लीज?…. नाहीच होणार कोणी शांत. मलाच सवय करावी लागेल या कोलाहलातसुद्धा माझा आवाज ऐकण्याची… ऑनलाईन शाळा Read More

एप्रिल-मे २०२०

या अंकात… संवादकीय : एप्रिल – मे २०२० कुछ ना कहो: स्लो माध्यमे बालक, पालक आणि मी एका शिक्षकाची डायरी संकटातील संधी आणि संधीतील शिक्षण कथा-कहाण्यांच्या परिघापलीकडे पालकांना पत्र अत्यावश्यक ते अनावश्यक व्हाया कोरोना जजमेंट डे लॉकडाऊनदरम्यान अनुभवलेले मातृत्व Download Read More

पालकांना पत्र

पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या मुलांना औपचारिक शिक्षणातून वर्षभर सुट्टी घेण्याची मुभा का द्यावी… क्लॉड अल्वारिस प्रसिद्ध पर्यावरणवादी असून गोवा फाऊंडेशन ह्या पर्यावरणाची निगराणी करणाऱ्या संस्थेचे संचालक आहेत. खाणींमुळे होणारी पर्यावरणाची हानी, अनियोजित शहरीकरण, सागरतटीय आणि जंगलातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी ह्या संस्थेच्या Read More

आता खेळा, नाचा

मनीष ‘फ्रीमन’शी पालकनीतीच्या आनंदी हेर्लेकरची बातचीत दोन वर्षांपूर्वी मी मनीषच्या ‘गेमॅथॉन’च्या (Game-a-thon) सत्राला गेले होते. मला आठवतंय, त्या सत्रानंतर दोन दिवस मी कुठल्या कारणाशिवायही इतकी आनंदात होते, की चेहर्‍यावरचं हसू काही लपत नव्हतं. कारणाशिवाय, आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल न होता Read More

फेक न्यूज! अर्थात, भंपक भरताड

गेली काही वर्षं, बहुधा इंटरनेटच्या प्रसारामुळे, आपल्यावर माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. ती निव्वळ माहिती असती, तर त्याकडे आपण दुर्लक्ष देखील केलं असतं. परंतु ह्यातली बरीचशी माहिती आपल्या भावनिक पातळीवर परिणाम करत असते. त्यामुळे ती झटकून टाकणं तितकंसं सोपं राहत Read More

वदनी कवळ घेता…

‘स्लो फूड’ हे शब्द वाचल्यावर तुमच्या मनात काय आलं? एक घास सावकाशपणे 32 वेळा चावून खाण्याची शिकवण, रात्रभर मंद आचेवर अन्न शिजवत ठेवण्याची पाककृती, किंवा जेवताना नेहमी दोन घास कमी खावेत हा नियम? अन्नाच्या बाबतीत ‘स्लो’ हे विशेषण विविध अर्थांनी Read More