मुलं स्वत: शिकत आहेत…

सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर Read More

असं झालं संमेलन…

संमेलनाचा पहिला दिवस सतत व्हॉट्सऍपवर एकमेकांना भेटणारे, तावातावाने चर्चा करणारे, हलकीफुलकी थट्टामस्करी करणारे शिक्षक, अधिकारी, तज्ज्ञ, पत्रकार, समुपदेशक, संपादक इ. लोक प्रत्यक्ष कसे दिसतात, कसं काम करतात हे पाहण्याची संधी या संमेलनात मिळणार होती. त्यामुळे सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. Read More

ही आहे उजेडाची पेरणी

गीता महाशब्दे महाराष्ट्रातल्या शिक्षणाने उभारी धरावी म्हणून शासकीय संस्थांकडून दोन हजार दहा साली अनेक उपक्रम राबवले गेले. त्यात शिक्षक-प्रशिक्षणे, पाठ्यक्रम-रचना, मूल्यमापन-निकष, राज्यपातळीवरील सर्व संस्थांची जोडणी अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. समविचारी शिक्षकांच्या गटाची उभारणी करणारा प्रकल्प महाराष्ट्राचे त्यावेळेचे राज्यप्रकल्प संचालक Read More

ज्ञानरचनावाद…. काय आहे आणि काय नाही?

नीलेश निमकर गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने Read More

संवादकीय – जून २०१४

सोशल मिडीया हे आजच्या काळातलं नवं माध्यम. हे माध्यम मुळातच ‘काय वाट्टेल ते’ या धर्तीचं आहे. आपण आपल्या कृतकफळ्यावर काय लिहावं ह्याला त्यामध्ये काहीच धरबंध नसतो, योग्यायोग्यतेचा कुठलाच निकष नसतो. हीच त्या माध्यमाची अडचण आहे, पण तेच त्याचं बलस्थानही आहे, Read More

संवादकीय – मे २०१४

पालकनीतीसारख्या लहानशा मासिकाची ताकद, समाजपरिस्थितीत बदल घडवण्याची गरज वाचकांपर्यंत पोचवावी आणि वाचकांना विचार करायला सुचवावं, एवढीच मर्यादित असते याची तुम्हाआम्हाला जाणीव आहे. आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी बाल-लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नाबद्दल पालकनीतीत चर्चा केलेली होती. त्या संदर्भात शाळा-बालरंजन केंद्रं अशासारख्या (जिथं Read More