संवादकीय – मे २००५

आपलं मूल ‘चांगलं’ मोठं व्हावं. त्यानं/तिनं जीवन सर्वार्थानं अनुभवावं, उपभोगावं. प्रसंगी लढण्याची जिद्द त्यांच्या अंगी असावी. ती जिद्द कष्टांनी प्रयत्नांनी आणि न थकता त्यांनी अनुसरावी. शिवाय चांगला जोडीदार मिळावा-मिळवावा. जो काही काम-उद्योग करायचा तो मनापासून, जीव लावून करावा. त्यात वैशिष्ट्यपूर्ण Read More

अनारको यमतलोकात….

लेखक : सतीनाथ षडंगी अनुवाद : मीना कर्वे कल्पना करा की उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर गल्लीत आला आहात…. रस्त्यावर कुणी चिटपाखरूही नाही, सगळ्या घरांचे दरवाजे बंद…. जवळच एक-दोन दांडगी कुत्री धापा टाकत पसरलेली…. चटका बसावा इतकं कडक Read More

एक नवीन धमाल मासिक ‘मामु’

परिचय – शुभदा जोशी गेल्या वर्षी जानेवारी २००४ मधे मुलांसाठी एक नवीन मासिक सुरू झालं – ‘मामु’. ‘मामु’ म्हणजे काय? हे असं कसं नाव? अशी नावापासूनच गंमत करणारं नि कुतुहल वाढवणारं हे मासिक. बारकाईनं शोधल्यावर आत कुठंतरी सापडतं. मामु म्हणजे Read More

गेल्या काही दिवसात….

‘पालक शाळा-अमरावती’ अमरावतीच्या डॉ. मोहना कुलकर्णी, स्वतःचं हॉस्पिटल, जम धरलेली प्रॅक्टीस. गेल्या काही वर्षांपासून पालकत्व, शिक्षण, विवाह या विषयांसंदर्भात समुपदेशनाचं काम सुरू करावं असा विचार त्यांच्या मनात येत होता. त्यांच्या आई शांताताई किर्लोस्कर यांच्या आयुष्यभराच्या ‘पालकत्वाच्या’ क्षेत्रातल्या कामाचा धागा या Read More

गोष्टी मुलांसाठी

एखाद्या कोर्‍या पाटीवर गिरवण्यासाठी किंवा एखाद्या कोर्‍या कॅनव्हासवर एखादी रेघ ओढण्यासाठी लागणारी जी अत्यंत शुद्ध संवेदनशीलता लागते त्याप्रकारची संवेदनशीलता लहान मुलांसाठी करायच्या लिखाणासाठी लागते. मग ती कथा असो, कविता असो वा इतर प्रकार. आपल्यासारख्या संस्करण झालेल्या, प्रौढ झालेल्या मनाचा एखाद्या Read More

बालकांचे पोषण

डॉ. मंजिरी निमकर शाळेची वार्षिक वैद्यकीय तपासणी पार पडली. ५०-६० टक्के विद्यार्थी कुपोषणाची लक्षणं दाखवीत होते. कुणाला रक्त कमी, कुणाचं वजन व उंची प्रमाणित वजन व उंचीपेक्षा कमी, कुणाला ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव अशा समस्या आढळल्या. त्यांचा उल्लेख करून फॅमिली डॉक्टरला Read More