मुलांच्या विभागाबद्दल

मुलांच्या कथांना कथा म्हणायचं की नाही ते वाचकांनीच ठरवावं. कधी त्या जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत, तर कधी संपूर्णपणे कल्पनेतून जन्मलेल्या आहेत. मुलं कोणासाठी असं लिहीत नाहीत, स्वत:साठीच लिहितात. सगळ्याच मुलांना आपणहून लिहायची बुद्धी होत नाही; पण लिहितं केलं, की लिहिता येणारे Read More

बेंजामिन आणि फ्रँकलिन

बेंजामिनकडे फ्रँकलिन नावाचं गरुड होतं. ती दोघं स्पेनमध्ये राहायची. एक दिवस बेंजामिननं फ्रँकलिनसोबत इजिप्तच्या वाळवंटात फिरायला जायचं ठरवलं. ती दोघं प्रवासाच्या तयारीला लागली. बेंजामिननं कपडे बॅगेत भरले. फ्रँकलिननं टोपी घातली आणि डोळ्याला काळा चष्मा लावला. बेंजामिननं सोबत भरपूर पाणी घेतलं. Read More

बहादूर लंगड्या

आमचा गाव जंगलाला लागून आहे. गावात नेहमी वाघ येतो. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ती तान्हापोळ्याची रात्र होती. नेहमीप्रमाणे लंगडू घरात झोपला होता. त्याचे बाबा चारणदास आबाजी पांघानीत* झोपले होते. घराचे दार आतून बंद होते, आणि पांघानीला ताटवा बांधला होता. गावात Read More

पृथ्वीवर चांदोबा

एकदा आकाशात ढग आले होते. त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता होती. मग रात्र झाली होती. की धपकन चांदोबा एका मोठ्या नदीत पडला. मग नदी चांदोबाला म्हणाली, ‘‘चांदोमामा, चांदोमामा, तू कोठून पडलास?’’ चांदोबा म्हणाला, ‘‘अगं मी आकाशातून पडलो. मला खूप थंडी Read More

पाऊस दणकून कोसळत होता

शाळा वेळेवर भरली, नेहमीप्रमाणे 100% विद्यार्थी शाळेत होते. वर्गात अंधार होताच, तरीही तासिका नियोजनाप्रमाणे सुरू होत्या. ओले अंग, ओले कपडे, थंडीत भरलेले कापरे, सगळे विसरून अभ्यास सुरू होता. पावसाला भिऊन कोणतेच काम अडले नाही. सायंकाळी शाळा सुटली, पाऊस कोसळतच होता. Read More

धानाची निंदणी

थंडीच्या दिवसांत आमच्या नासीपूर गावातल्या नदीवर आम्ही खेळायला जायचो, तेव्हा खूप मजा येई. डोक्यावर कोवळं-कोवळं ऊन आणि पायात चमचमणाऱ्या लहान-लहान मासोळ्या. आम्ही मासे पकडून ते कापडाच्या खोळीत भरत असू. आणि मग पाण्यात सोडून देत असू. एखादी मोठी मासळी हाती लागली, Read More