संवादकीय – जून २०१४

सोशल मिडीया हे आजच्या काळातलं नवं माध्यम. हे माध्यम मुळातच ‘काय वाट्टेल ते’ या धर्तीचं आहे. आपण आपल्या कृतकफळ्यावर काय लिहावं ह्याला त्यामध्ये काहीच धरबंध नसतो, योग्यायोग्यतेचा कुठलाच निकष नसतो. हीच त्या माध्यमाची अडचण आहे, पण तेच त्याचं बलस्थानही आहे, Read More

संवादकीय – मे २०१४

पालकनीतीसारख्या लहानशा मासिकाची ताकद, समाजपरिस्थितीत बदल घडवण्याची गरज वाचकांपर्यंत पोचवावी आणि वाचकांना विचार करायला सुचवावं, एवढीच मर्यादित असते याची तुम्हाआम्हाला जाणीव आहे. आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी बाल-लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नाबद्दल पालकनीतीत चर्चा केलेली होती. त्या संदर्भात शाळा-बालरंजन केंद्रं अशासारख्या (जिथं Read More

‘बेशिस्तीकडे’ बघण्याचा नवा दृष्टिकोण

सकारात्मक शिस्त – लेखांक ३ – शुभदा जोशी ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या सिनेमातलं एक दृश्य मला आठवतंय. पाच-सहा वर्षांचा सिद् हा पराकोटीच्या संतापानं बाबांवर ओरडत असतो, ‘‘वाईट्ट आहात तुम्ही! मला खूप राग येतो तुमचा.’’ वडील त्याला फरपटत त्याच्या खोलीकडे नेतात, Read More

तंत्रज्ञानाचा विकास नव्हे, विकासासाठी तंत्रज्ञान

संजीवनी कुलकर्णी ‘‘कट्टणभावी गावात पाणी दुरून आणावं लागतं. शंभर मीटर अंतरावरून एक घागरभर पाणी आणायला मी आणि माझी सहकारी गेलो होतो. दोघांनी आपापली घागर भरून आणायची ठरवली होती. प्रत्यक्षात दोघांनी मिळून आणली, अर्धी घागर! आम्ही दमलो, ओले झालो, कसेबसे धापा Read More

रसिका : एक प्रकाश-शलाका

ज्योती कुदळे ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीला, मुख्य रस्त्याला लागूनच १२-१५ झोपड्यांचा एक समूह दिसतो. हा ताम्हिणी गावाचाच पण गावापासून अलग असा कातकरी पाडा. छोट्या छोट्या कुडाच्या, शेणामातीनं सारवलेल्या झोपड्या, जमतील तशा, जागा मिळेल तिथे बांधलेल्या. पाड्यावर पाणी, शौचालयं, वीज अशा मूलभूत Read More

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी…

साधना दधीच प्रमोद गोवारीची ओळख करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. मी २००७ पासून पालघर भागातल्या ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेचं काम करू लागले. त्यावेळी संस्थेच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून प्रमोदशी माझी ओळख झाली.पुढं संस्थेला एका नव्या आर्थिक संकटाला Read More