खेळघर

तळघराच्या याच खिडकीतून मी खेळघर पाहिलं आणि नंतर प्रत्यक्षात अनुभवलं देखील. मी लातूरची. मला खेळघराविषयी फारशी माहिती नव्हती. डी.एड्. करतानाच मी ठरवलं होतं की मला एक चांगली शिक्षिका व्हायचं आहे. पण त्यासाठी दोन वर्षात मिळालेली शिदोरी फार अपुरी आहे हे Read More

अनुक्रम

गाव, गोठा, सेलफोन, सायबर… / मोहन देशपांडे / ९ लाईफमें आगे निकलना है, बस ! / मकरंद साठे / १७ पांच कहानियां (कथा) / सुषमा दातार / २५ लिहावे नेटके : एक नेटका आणि उपयुक्त पुस्तक संच / वसंत आबाजी Read More

पालकनीती – ऑक्टोबर नोव्हेंबर २०१०

मातीत पडलेलं बी तिच्यातलंच काहीबाही घेत उलून येतं आतून…. वाढतं…. बदलतं…. अर्थवान करतं स्वतःचं ‘बी’ पण आणि मातीचं मातीपणही. …अशी तर न बदलणारीच असते बदलाची रीत. पण… काळाच्या बाळानं टाकलेल्या दरेक वर्षाच्या एकेका पावलागणिक आम्ही काल घेतलेल्या श्वासांच्या उच्छ्वासांनी काय Read More

संवादकीय – दिवाळी २०१०

मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला जगात कधीही – आपल्याला आपली माणसं आहेत, ती आपल्या सुखदु:खांशी सहभावी आहेत ह्याची खात्री असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगाचा मायावीपणा Read More

आता बोला (कविता) …

आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी. हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्‍या आवाजाच्या खुणा पुरेनात, मनातलं तर्‍हेतर्‍हेचं देण्याघेण्यासाठी…. तेव्हा आपल्याच गळ्यातल्या आवाजांना निरखत… उलगडत… वापरत शोधल्या नि ठरवल्या त्यानं – मनाआतलं लाख परीचं काही बाही – एकमेकांपाशी पोहोचवणार्या शब्दांच्या खुणा. आता Read More

कला कशासाठी ….

जगण्याचा वेग प्रचंड वाढतोय. आज सगळेच जण कशा ना कशाच्या मागे धावताना दिसताहेत – विशेषतः पैशाच्या, प्रतिष्ठेच्या. असं धावताना कपडालत्ता, खाणंपिणं, करमणूक यात रमताना कधी ना कधी पैशाचं फोलपण जाणवतं. एक पोकळी निर्माण होते. जगणं निरर्थक वाटू लागतं. या पोकळ, Read More