माझ्या वर्गातून

आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता हा वादाचाच मुद्दा राहिलेला आहे; स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. आज परिस्थिती बदलते आहे, असे बरेच लोक म्हणताना दिसतात. तसे ते खरेही आहे; पण या संदर्भात आमूलाग्र परिवर्तन ज्या पद्धतीने, ज्या दिशेने व्हायला हवे  तसे ते होताना Read More

एक मैं और एक तू!

आई-बाबांची नोकरी आणि लैंगिक समानतेची व्यावहारिकता…  हल्लीच युट्यूबवर लहान मुलांची गाणी ‘ब्राऊझ’ करताना एका जुन्या, हिंदी बडबडगीताची अ‍ॅनिमेटेड  आवृत्ती पाहिली. मुलांना चौकोन, त्रिकोण, गोल अश्या विविध आकारांची ओळख करून देणाऱ्या ह्या गाण्यात सुरुवातीचीच ओळ होती: ‘मम्मी की रोटी गोल गोल, Read More

समतेच्या दिशेनं जाताना…

एकदा ७वीच्या वर्गात मुलामुलींशी चर्चा करताना मुलांचे आणि मुलींचे अनुभव कसे वेगळे असतात असा विषय निघाला. असा महत्त्वाचा विषय निघाल्यावर मी लगेच पुढे सरसावलो. मुलामुलींच्या वेगळ्या आवडीनिवडी, त्यांच्यावर असलेली बंधनं, मोठं झाल्यावर वेगवेगळ्या होणाऱ्या  दिशा, यावर आम्ही बोललो. मुलांचं आणि Read More

मुरिया गोंड आदिवासी

जग वेगवेगळ्या धारणा असलेल्या अनेक समाजघटकांचं बनलेलं आहे. आपला गाडा हाकण्याची प्रत्येक घटकाची आपापली व्यवस्था असते. जगाच्या एका भागात घडणारी गोष्ट दुसऱ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने विपरीतही असू शकते. हे भाग भिन्न देशांतील असतील असंही नाही; अगदी एकाच देशात, एकाच Read More

पण ह्या बद्दल कोण बोलणार?

आमच्या घरापाठीमागच्या जंगलात मी एकदा शेजारच्या झोपडवस्तीतल्या एका मुलग्याला हस्तमैथुन करताना पाहिलं. इतकं गलिच्छ वाटलं मला…आणि रागही आला. मनात आलं ‘असभ्य, घाणेरडा!’… जंगलातल्या सुंदर शांततामय एकांताचा गैरवापर केला जातोय असंही वाटलं. नंतर आपल्या खोलीचं दार लावताना अचानक प्रश्न पडला की, Read More

स्टॉप व्हिस्परिंग अँड स्टे फ्री!

“अरे चॅनल  बदला रे, पॅडची जाहिरात लागलीय”, “देवळात नको जाऊस”, “कुणाला शिवू नकोस”, “स्वयंपाकघरात जाऊ नकोस”, “पुरुषांशी या विषयावर नाही बोलायचं”… प्रत्येक मुलीने काही वेळा आपल्या पालकांकडून आणि हमखास आपल्या आज्जीकडून अश्या सूचना ऐकल्या असतील. मुलींच्या आयुष्यातल्या या एका अत्यंत Read More