संवादकीय – फेब्रुवारी २००८

कार्पोरेशनच्या शाळांमधे शिकवणार्या शंभर शिक्षकांपैकी सुमारे पन्नासांना डिस्लेक्सियाबद्दल थोडी, तरी पण योग्य माहिती होती, असं ऐकून मी थक्क झाले. कसं काय? असा प्रश्न विचारता-विचारता थांबले. समोरच्यानं आपणहून उत्तर द्यायला सुरवात केली, पण त्याआधीच मला ते कळलं. तुम्हा सर्वांनाही कळलं असणार. Read More

वेगळेपणानं चमकणारा ‘तारा’

सुषमा दातार तारे जमीं पर’ या चित्रपटाबद्दल लिहायच्या आधी काही कबुलीजबाब देणं मला आवश्यक वाटतं. खरं म्हणजे पालकनीती सारख्या मासिकांतून आणि मुलांसाठीच्या मासिकांतून पुस्तक परीक्षण किंवा शिफारस याप्रमाणे चित्रपटांविषयीही नियमित लिहायला हवं आहे हे जाणवत होतं पण कुठेतरी मनातल्या ठोक Read More

सार्वत्रिकीकरणामधील आव्हाने

राजन इंदुलकर श्रमिक सहयोग संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यात चालविलेल्या शैक्षणिक उपक्रमाविषयी ‘पालकनीती’च्या मागील काही अंकातून तपशीलवार मांडणी करण्यात आली. हा या मालिकेतील शेवटचा लेख आहे. गेली १५ वर्षे सलगपणे श्रमिक सहयोगने हा उपक्रम चालविला आहे. या कार्याचा मुख्य रोख वंचित घटकांच्या Read More

भरारी

सीमा कुलकर्णी सीमा कुलकर्णी या लातूरच्या जीवन विकास प्रतिष्ठानाच्या मतिमंद मुलांच्या विद्यालयात क्रिडा व विशेष शिक्षिका म्हणून काम करतात. थोडासा मतिमंद आणि पूर्णतः कर्णबधिर असलेल्या अन्वरने शाळेत प्रवेश घेतल्यापासून स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहण्यापर्यंतच्या प्रवासातली काही निरीक्षणे इथे नोंदवली आहेत. Read More

वेदी – लेखांक – ११

सुषमा दातार त्या रविवारी आम्ही खूपच आनंदात होतो. आम्हाला फास्ट आणि बिन धुराच्या इलेक्ट्रिक ट्रेनमधून प्राणी संग्रहालयात नेलं होतं. आम्ही पिंजर्याच्या पुढून दोघं किंवा तिघं हात धरून चालत होतो. एका हातानं रेलिंगला धरलं होतं. सगळ्यात पुढे रासमोहन सर होते. ते Read More

अध्ययन वैविध्य : एक तोंडओळख

डॉ. प्रज्ञा कुलकर्णी अथर्वच्या निकालाचा दिवस म्हणजे घरातलं वातावरण बिघडवणारा दिवस. अथर्व हा एक बुद्धिमान पण गुंड मुलगा. भरपूर दंगामस्ती करतो. त्याला तोंडी सगळं येत असतं पण परीक्षेत भरपूर मार्क कधीच पडत नाहीत. अथर्वच्या आईने यावेळी स्वत: अभ्यासात लक्ष घालायचं Read More