क्लॉड शॅनन

प्रांजल कोरान्ने क्लॉड शॅनन हे नाव न्यूटन किंवा आईनस्टाईनएवढे प्रसिद्ध नाही हे खरे; परंतु त्याने बजावलेली कामगिरी त्यांच्या इतकीच किंबहुना काकणभर सरसच म्हणावी, अशी आहे. आज संगणक, मोबाईलपासून इंटरनेटपर्यंत आपल्या वापरात असलेल्या सगळ्या माहिती-संपर्क-तंत्रज्ञानाची पाळेमुळे क्लॉडने मांडलेल्या गणिती सिद्धांतात आहेत. Read More

लहान मुलांना कोडिंग शिकवण्याची घिसाडघाई

अनुराधा सी मुलांना प्रोग्रामिंग शिकवणार्‍या जाहिरातींचा हल्ली निरनिराळ्या समाज-माध्यमांवर झालेला प्रचंड सुळसुळाट आणि त्याद्वारे पालकांवर होत असलेला भडिमार आपण सगळेच पाहतो आहोत. अशा क्लासला प्रवेश घेतलेली मुले तुमच्या घरात किंवा तुमच्या पाहण्यात असतील. पालक म्हणून आपल्याला मुलांच्या भवितव्याची काळजी वाटणे Read More

पुस्तकमैत्री अभ्यासक्रम

मीना निमकर पुस्तके मनाचे पंख असतात  जगण्याची प्रेरणा असतात  आपत्तीत रस्ता दाखवणारा दिवा असतात.  ज्या मुलांना लहान वयात भरपूर गोष्टी ऐकायला मिळतात, पुस्तके हाताळायला मिळतात, पुस्तके वाचून दाखवली जातात, अशी मुले लवकर वाचू लागतात असे संशोधन सांगते. वाचणे म्हणजे फक्त Read More

बालविकासाच्या सौधावरून

ऑटिझम समजून घेताना डॉ. पल्लवी बापट पिंगे  काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिकला एक कुटुंब आले. आईवडील आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा. मुलगा अजून बोलत नाही अशी पालकांची तक्रार होती. मुलाशी बोलले, त्याला खेळणी दाखवली, तेव्हा आणखी काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. Read More

प्रत्यय

सुजाता लोहकरे  जन्मतःच मतिमंद असलेल्या आमच्या मुलीला, सईला, आम्ही जाणीवपूर्वक वाढवत राहिलो. स्वतःही तिच्यासोबत अनेक अर्थानं वाढत राहिलो. या प्रवासात आम्हाला सापडलेली जगण्याची उमेद आणि आनंदाची बीजं अशा अनेक मुलांपर्यत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोचायला हवीत, त्यासाठी आपले हात थोडे अधिक Read More

बाबा लहान होता तेव्हा – ३

बाबा कविता लिहितो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला वाचायला फार आवडायचं. चार वर्षांचा असतानाच तो वाचायला शिकला. अख्खाच्या अख्खा दिवस वाचन करत बसायचा. इतर मुलं खेळत असायची, दंगामस्ती करत असायची. पण बाबा मात्र वाचत बसे. आजीआजोबांना त्याची काळजी वाटू लागली. Read More